किरकोळ कारणावरून तरूणाला लोखंडी पट्टीने मारहाण

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव तालुक्यातील भोलाणे गावात न विचारता पाण्याची कॅन घेतल्याच्या कारणावरून एकाला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली तर लोखंडी पट्टी मांडीवर मारून दुखापत केल्याची घटना बुधवार ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, विलास तुळशीराम कोळी (वय-४१) रा. भोलाणे ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवार ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास गावात राहणारा मयुर ज्ञानेश्वर नन्नवरे याने विलास कोळी यांची पाण्याची कॅन न विचारता घेतली. याचा जाब विचारल्याचा राग असल्याने  मयूर नन्नवरे याने लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली तर लोखंडी पट्टी मांडीवर मारल्याने गंभीर दुखापत झाली.

जखमी झालेल्या विलास कोळी यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यानंतर शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विलास कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मयूर नन्नवरे याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे करीत आहे.

Protected Content