रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | निर्दयीपणे सुमारे २५ गुरांना कोंबून बुरहानपूरकडून वाहतूक करणारा ट्रक आज सकाळी रावेर पोलिसांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पकडला. यामुळे एकच खळबळ उडाली. कोंबून भरलेल्या सर्व गुरांना गौ-शाळेत रवाना केले असून गुरांची वाहतूक करणारा ट्रक चालक फरार झाला आहे.
या बाबत वृत्त असे की, “२५ गुरांना निर्दयीपणे भरुन ट्रक (क्र एमएच १८ बिजी ३६८३) हा अवैधपणे गुरांची वाहतूकीच्या संशयावरुन लोकांनी थांबवला. सहायक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक यांच्या मार्गदर्शनावरुन ट्रकवर चढून पोलीस कर्मचारी मुकेश सोनवणे, विशाल पाटील, अमोल जाधव यांनी ट्रकवरील तारपत्री काढली असता ट्रकमध्ये सुमारे २५ गायी, वासरी, बैल, हे कोंबून भरलेले होते.
ट्रक व गुरे असे एकूण ६ लाख १८ हजाराचे पशुधन रावेर पोलिसांनी जप्त केले असून रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.