भडगाव- तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या १११ प्रभागातुन ३०९ जागा साठी एकुण ९५० अर्ज दाखल झाले आहेत. तर आज अखेरच्या दिवशी तब्बल ६४८ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
तालुक्यातील ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज प्राप्त झालेली संख्या पुढील प्रमाणे आहे. यात आमडदे- ५८, भोरटेक-१९, सावदे-२२, वडगाव बु.-१३, महिदळे- ४६, वडगाव नालबंदी-२२, वडगाव बु.-३४, वाक-११, भट्टगाव- २०, पिचर्डे-३१, बात्सर-२६, पाढरंद-१७, माणकी-१४, आचंळगाव-३०, कोठली-३४, तांदुळवाडी-२२, वाडे-३९, बाळद खु.-१४, बांबरुड प्र. ब.-३३, जुवाडी-२६, लोण प्र ब-२४, पिपराखेंड-४८, गिरड-६६, बांबरुड प्र उ-२४, मळगाव-१५, बोदर्डे-२३, पिप्रीहाट-३३, शिवणी-३१, पिपळगाव बु- २८, पळासखेडे- १९, वरखेड-२३, वडजी-५४, खेडगाव-३१ आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने तहसिल कार्यालयात नागरीक, महिला सह तरुणाची मोठया संख्येने गर्दी होती. यामुळे तहशिल आवारात जणु काही यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. तालुक्यात काही ठीकाणी एकास एक, काही ठीकाणी दुरंगी तर काही ठीकाणी तिरंगी लढती आहे.