घरातून मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याला पकडले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गच्चीवरील घराचा दरवाजा उघडून घरातून मोबाईल चोरणार्‍या ओंकार योगेश सोनवणे (वय-२०, रा. शनिपेठ) याला रहिवाशांनी रंगेहाथ पकडले. ही घटना सोमवारी ६ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्रीच्या सुमारास शनिपेठेतील मरीमाता मंदिर परिसरात घडली. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शनिपेठेतील मरीमाता मंदिराजवळ श्रीकांत अरुण पाटील (वय-२४) हा तरुण वास्तव्यास आहे. सोमवारी ६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ते झोपलेले असतांना त्यांच्या घराजवळील ओंकार सोनवणे हा गच्चीवरुन त्यांच्या घरात शिरला. दरम्यान, घरातील मोबाईल चोरुन नेत असतांना अचानक श्रीकांत पाटील यांना जाग आल्याने त्यांनी ओंकार सोनवणेला पकडून ठेवत आरोळ्या मारल्या. यावेळी घरातील सर्वजण जागे झाले. त्यांनी डायल ११२ क्रमांकावर कॉल करीत घटनेची माहिती दिली. रात्री गस्तीवर असलेले शनिपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी राहूल पाटील व अनिल कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन चोरटा ओंकार सोनवणे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास पोलीस नाईक परिष जाधव करीत आहे.

 

Protected Content