जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये ९ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिाी ।  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) व महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत आयोजित करण्यात येत आहे. वर्षानुवर्ष प्रलंबित राहणारे खटले, आर्थिक चणचण, वेळेचा अपव्यय या सर्व गोष्टी टाळणे, आप-आपसात सामोपचाराने तडजोड घडवून वाद मिटविण्याकरीता या लोक अदालतींचे आयोजन करण्यात येणार आहे. जळगाव येथे जिल्हा व सत्र न्यायालयाचे आवारात जिल्हा विधी सेवा …

[16:55, 8/11/2023] Jitendra Kotwal Sir: बाल शक्ती व बालकल्याण पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

जळगाव- केंद्र शासनाच्या वतीने बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कारांसाठी ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

बाल शक्ती पुरस्कार २०२४ साठी  www.awards.gov.in हया संकेतस्थळाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांनी (वय ५ पेक्षा अधिक १८ वर्षापर्यंतच्या)  शिक्षण, कला सांस्कृतिक कार्य खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा  क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे. अशांना बाल शक्ती  पुरस्कार दिला जातो.

 

मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्या प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान ७ वर्षे काम करणाऱ्या व्यक्तिस वैयक्तीक गटात बालकल्याण पुरस्कार दिला जातो.  संस्था गटात बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला  पुरस्कार दिला जातो.  संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी . बालकल्याण क्षेत्रात किमान १० वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.असे ही श्रीमती सोनगत यांनी सांगितले.

Protected Content