जळगावात रविवारी होणार पहिले लेवा गणबोली साहित्य संमेलन

leva gan boli

जळगाव (प्रतिनिधी)। शहरात येत्या रविवारी २४ मार्च पहिल्या लेवा गण बोली साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात होणाऱ्या या संमेलनाचे उद्घाटन लोकनेते एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात येणार असून संमेलनाध्यक्ष डॉ. राम नेमाडे तर स्वागताध्यक्ष डॉ. अरविंद नारखेडे असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील, आमदार राजूमामा भोळे, लेखक-समीक्षक डॉ. राजन गवस, साहित्यिक डॉ. आशालता कांबळे, कवी-समीक्षक प्रा.डॉ. मनोहर जाधव, रोबोटिक्स इंजिनीअर आशिष चौधरी हे उपस्थित राहणार आहेत. या सम्मेलनाचे निमंत्रक आहेत डॉ. नि.रा. पाटील तर आयोजक तुषार वाघुळदे यांनी केले आहे.

सदरील संमेलन दिवसभर चालणार असून सकाळी ८ वाजता शहरातील आप्पा महाराज समाधीपासून ते संमेलन स्थळापर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते १२ या दरम्यान उद्घाटन सोहळा होईल. दुपारी १२ ते २ पर्यंत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्र.श्रा. चौधरी असतील तर डॉ.नि.रा. पाटील (डोंबिवली), डॉ. काशिनाथ बराटे (परतवाडा), डॉ.प्रा. कमल पाटील (पुणे), डॉ. रमाकांत कोलते (यवतमाळ), डॉ. सिंधू भंगाळे (फैजपूर), डॉ. प्रभात चौधरी (खिरोदा), डॉ. प्रशांत धांडे (हिंगोणा), डॉ. देवबा पाटील (खामगाव) व प्रा. संध्या महाजन (जळगाव) हे सहभागी होणार आहेत. दुपारी २ ते ३ दरम्यान लेखकांचे मनोगत हा कार्यक्रम होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमिला भिरूड व डॉ.नि.रा. पाटील हे असतील तर डॉ. हरिश्चंद्र बोरकर, डॉ. रमेश सूर्यवंशी, डॉ. पुष्पा गावित, शाम मोरे, अ.फ. भालेराव, सुखलाल चौधरी, रवींद्र पांढरे व मारोती तिरटकर हे सहभागी होणार आहेत. त्यानंतर संमेलनस्थळी महसूल व वन मंत्रालयाचे उपसचिव शामसुंदर पाटील व जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे हे मान्यवर भेट देणार आहेत.

दुपारी ३ ते ४ यावेळात कथाकथन व नाट्यछटा असा कार्यक्रम होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी प्रा.सौ. सिंधू भंगाळे असतील. कथाकथन प्रा.व.पु. होले करणार आहेत तर नाट्यछटा डॉ. लता चौधरी (पुणे), डॉ. अरविंद नारखेडे (जळगाव), श्रीमती लीला गाजरे (ठाणे), रवी पाटील (डोंबिवली), विनोद इंगळे (पुणे) व सौ. राजश्री पाटील (अहमदाबाद). दुपारी ४ ते ५ या वेळात काव्य संमेलन होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. अ.सु. पाटील असतील तर राजेंद्र चौधरी (रोझोदा), गणेश जावळे (बामणोद), लता चौधरी (पुणे), मोहन वायकोळे (बडोदा), मिलिंद धांडे (भुसावळ), पंकज पाटील (मलकापूर), निवेदिता पाटील (पुणे), अंजली बोरोले ((ठाणे), रवी पाटील (डोंबिवली), संगीता चौधरी (ठाणे), योगिता नेमाडे (पुणे) लीला गाजरे (ठाणे), विनोद इंगळे (पुणे), कविता लोखंडे (मुंबई) व वंदना चौधरी (वापी) हे कवी सहभागी होणार आहेत.

Add Comment

Protected Content