नोटांनी भरलेला टेम्पो उलटला; ७ कोटी रूपयांची रोख रक्कम जप्त

गोदावरी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेश राज्यामधील गोदावरी जिल्हयात ११ मे रोजी शनिवारी मोठया प्रमाणात रोकड जप्त झाली आहे. एका छोटया टेम्पोमधून सुमारे ७ कोटीची रक्कम सापडली आहे. एका ट्रकने या टेम्पोने या वाहनाला धडक दिल्यामुळे हे टेम्पो उलटले असता ही रक्कम संपूर्ण रस्त्यावर पडली होती.

या अपघातात टेम्पोच्या ड्रायव्हरला गंभीर दुखापत झाली आहे. या टेम्पोमध्ये नोटांचे सात बॉक्स पोतीच्या मागे लपवण्यात आले होते. टेम्पो उलटल्यानंतर पोलिसांनी माहिती मिळाल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी रक्कम जप्त केली. ही घटना विजयवाडा ते विशाखापट्टनम मार्गावर घडली. आंध्र प्रदेश राज्यात लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी राज्यातीत सर्व २५ जागांवर मतदान प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

Protected Content