उसनवारीच्या पैशांवरून तरूणाच्या डोक्यात टाकला दगड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील चंदू आण्णानगर येथे ऊसनवार पैसे मागण्याच्या कारणावरुन एकाने तरुणाच्या डोक्यात मारुन त्याला दुखापत केल्याची घटना रविवार, १६ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली, याप्रकरणी मारहाण करणाऱ्या तरुणाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील स्वामी समर्थ कॉलनी येथे संदीप सुधीर खांडेकर हा राहतो. तो रविवारी सायंकाळी ६ वाजता संदीप हा सुदत्त कॉलनीतील आव्हाणे शिवारात राम भरोसे यांच्याकडे ऊसनवार दिलेले पैसे मागण्यासाठी ठेकेदारासोबत दुचाकीने जात होता. यादरम्यान याच पैशांवरुन अचानकपणे दुचाकीवर बसलेल्या संदीप यांच्या डोक्यात मुकेश राठोड याने दगड मारुन दुखापत केली, या घटनेत संदीप जखमी झाला आहे. संदीप याने दिलेल्या तक्रारीवरुन मुकेश राठोड रा. आव्हाणे शिवारात सुदत्त कॉलनी याच्याविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनेश पाटील हे करीत आहेत.

Protected Content