समृध्दी महामार्गावर उभ्या ट्रकची ट्रकला धडक; चालक जागीच ठार

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अमरावती जिल्हयातील धामणगाव तालुक्यात तळेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर उभ्या ट्रक पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने यामध्ये पश्चिम बंगाल राज्यातील ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर ट्रक क्रमांक एन.एल.०१ए.ए.४१९० ने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. त्यामुळे अपघात झाला.
ट्रक क्रमांक यूपी ७२ एटी ३३०२चा चालक मो. इब्राहिम मो. इलियास प्रतापगड उत्तर प्रदेश व क्लीनर मो अमीर मो-सलीम खान रा. प्रतापगड उत्तरप्रदेश हे ट्रकचा टायर रोडच्या साईडला ट्रक उभे करून बदलत होते. त्याचवेळी उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली त्यामुळे अपघात झाला. यात चालक सुभाश चंद्रबोद बोदरा रा. पाला हावडा पश्चिम बंगाल हा ट्रकमध्ये अडकला होता. महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी सदर ट्रक चालकाला बाहेर काढून त्याला रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पाठविले. तसेच दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव खंडेश्वर येथे पाठविले. पोलिसांनी अपघातामुळे खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.

Protected Content