भरधाव पिकअप वाहन पानटपरीवर धडकले; दोन जण जखमी !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील आंबेडकर नगर भागात बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता एका बुलेरो पिकअप वाहनाने पानटपरीला जोरदार धडक दिली. या अपघातात पान टपरीजवळ उभे असलेले एक पुरुष ग्राहक आणि टपरी चालक महिला गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

जळगावच्या जुने जळगाव गाव परिसरातील आंबेडकर नगर भागात रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या काँक्रिटीकरणाच्या कामावर वापरण्यात येणाऱ्या बुलेरो पिकप गाडीने बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता रस्त्यावरील पान टपरीला जोरदार धडक दिली. या पान टपरीवर उभे असलेल्या ग्राहक पुरुषाला व पानटपरी चालक महिलेला गंभीर दुखापत झाली. ही बुलेरो पिकअप वाहनाने पान टपरीला धडक दिल्यानंतर पुढे असलेल्या विद्युत रोहित्रच्या खांबाला जाऊन धडकली. रस्त्याच्या कामावर वापरण्यात येणाऱ्या या बुलेरो पिकअप वानाने दोन जणांना जखमी केली असून यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. अपघात घडल्यानंतर गाडीवरील चालकाने पळ काढला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. या संदर्भात पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content