एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील आडगाव गावाजवळ दुचाकी वर जात असलेल्या दोन जणांना चार चाकी वाहनाने भारतावर जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी 19 जून रोजी दुपारी अडीच वाजता गल्ली आहे या संदर्भात कासोदा पोलीस ठाण्यात चार चाकी वाहनावरील चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्यवान शामराव वडर रा.कासोदा ता.एरंडोल असे मयत झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे राहणारे सत्यवान वडर हे त्यांचा मित्र रवींद्र गुलाब लोंढे यांच्यासोबत गुरुवारी १९ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास एरंडोल ते भडगाव रोडवरील आडगाव गावाजवळ दुचाकी (एमएच १९ डीडी ४५४१) ने जात होते. त्यावेळी समोरून येणारी चार चाकी महिंद्रा मॅक्स कंपनीची गाडी क्रमांक (एमएच २० जीसी ३००१) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सत्यवान वडर हा जागीच ठार झाला. तर त्याच्यासोबत मागे बसलेला रवींद्र लोंढे हा गंभीर जखमी झाला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर जखमीला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेवर संदर्भात माधवराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी वाहनावरील चालक किशोर रामकिशन पाटेकर (वय २४ रा. गारखेडा जि. छत्रपती संभाजी नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार किशोर पाटील करीत आहेत.