भरधाव कारची झाडाला धडक; तीन जण ठार

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कल्याणवरून भीमाशंकरला महादेवाच्या दर्शनाला जाणा-या गाडीला कल्याण-मुरबाड रस्त्यावर भीषण अपघात झाला. कल्याण-मुरबाड रस्त्यावरील वडापा गावाजवळ कारचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट झाडावर जाऊन आदळली. ही धडक इतकी जबर होती की त्यात कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

माळशेज घाटात हा अपघात झाल्याची माहिती आहे. कल्याण-मुरबाड मार्गावर झालेल्या या अपघातात तिघांनी जीव गमावला आहे. तर एकजण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. दोघे किरकोळ जखमी आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Protected Content