घरासमोरून ऊसतोड कामगाराच्या दुचाकीची चोरी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील करगाव इच्छापूर तांडा येथून एका ऊसतोड कामगाराची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी गुरूवारी २ मे रोजी दुपारी ३ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, रमेश मनोहर राठाडे वय ५५ रा. करगाव इच्छापूर तांडा. ता.चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. ऊसतोडणीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २९ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर पार्कींगला लावलेली होती. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. ही घटना ३० एप्रिल रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर त्यांनी गुरूवारी २ मे रोजी दुपारी ३ वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्यात तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जयेश पवार हे करीत आहे.

Protected Content