पिंपळगाव कमानी तांडा पाणी सोडण्याच्या कारणावरून शिवीगाळ

जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पिंपळगाव कमानी तांडा येथे पाणी सोडण्याच्या कारणावरून गावातील सरपंचासह इतरांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पहूर पोलिस ठाण्यात ६ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमानी तांडा येथे २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता गावातील पाणी सोडण्याचे कारणावरून सरपंच सुनीता प्रल्हाद चव्हाण वैशाली यांना गावातील गोकुळ प्रधान राठोड, ज्ञानेश्वर प्रधान राठोड, मलखान प्रधान राठोड, गोपाल गोकुळ राठोड, कृष्णा गोकुळ राठोड, ईश्वर गणेश राठोड सर्व रा. पिंपळगाव कमानी तांडा ता. जामनेर यांनी सुनीता चव्हाण, दुर्गा वसंत चव्हाण आणि प्रल्हाद कपूरचंद चव्हाण या तिघांना चापटाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच जीवेठार पाण्याची धमकी दिली. या संदर्भात सरपंच महिला सुनीता प्रल्हाद चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पहूर पोलीस ठाण्यात सोमवारी २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार हंसराज मोरे करीत आहे.

Protected Content