जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तुमच्या दुकानावरील गिऱ्हाईक माझ्या गाडीवर बसतात म्हणून दोन दुकानदारांमध्ये वाद झाला. या वादातून एकाने सुकाम चिंधू चिमणकारे (वय ६५, रा. बजरंग हौसिंग सोसायटी) यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शनिवार २२ जून रोजी दुपारी २२ वाजता रामानंद नगरातील चर्च समोर घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील बजरंग हौसिंग सोसायटीमध्ये सुकाम चिमणकारे (वय-६५) हे वास्तव्यास असून शनिवार २२ जून रोजी दुपारी ते त्यांच्या दुकानात होते. त्यांच्या शेजारी असलेल्या टेलरिंगच्या दुकानादार पती पत्नी हे चिमणकारे यांच्याकडे आले. त्यांनी तुझे गिऱ्हाईक माझ्या गाडीवर बसतात, या गोष्टीवरुन त्यांच्यात वाद झाला. या वादावेळी त्यानी चिमणकारे यांच्या दुकानाला लावलेला बांबू हालवून त्यांचे दुकान पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुकाम चिमणकारे हे त्यांना समजविण्याचा प्रयत्न केले असता, त्यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली.
शेजारच्या दुकान मारहाण करीत असतांना त्यांनी फोन करुन त्यांच्या मुलांना बोलावून घेतले. त्यांची मुले आल्यानंतर त्यांनी देखील चिमणकारे यांना मारहाण केली, यावेळी त्यांच्यातील एकाने चिमणकारे यांच्या डोक्यात धारदार वस्तुने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी चिमणकारे यांनी लागलीच रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.