मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अखेर शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. बबनराव घोलप यांच्या सोबत माजी आमदार संजय पवार यांनी सुध्दा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये नुकतेच झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील बबनराव घोलप उपस्थित नव्हते. तेव्हापासून ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली होती.
बबनराव घोलप पाच वेळा आमदार राहिले आहे. १९९० ते २०१४ दरम्यान नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदार संघातून ते निवडून आले आहे. आता शिर्डीमधून निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे तिकीट न मिळाल्याने ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहे.