मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बोदवड तालुका प्रशासनाची आढावा बैठक माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार जितेंद्र कुंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसील कार्यालय बोदवड येथे घेण्यात आली.
नायब तहसीलदार सूर्यवंशी बी. डी. ओ काथेपुरी, पोलिस निरीक्षक गुंजाळ, तालुका कृषी अधिकारी पाडवी, राज्य परिवहन विभागाचे सोनवणे, शिक्षणाधिकारी लहासे, विद्युत वितरण विभागाचे झोपे, यांच्यासह इतर शासकीय प्रमुख आणि पदाधिकारी उपस्थित होते
राष्ट्रवादी जनसंवाद यात्रे दरम्यान रोहिणी खडसे यांच्याकडे तालुक्यातील नागरिकांनी विविध समस्या मांडल्या होत्या. रोहिणी खडसे यांनी त्या समस्या आढावा बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडून त्यातील बहुतांशी समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. यावेळी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर, तालुकाध्यक्ष आबा पाटील, रामदास पाटील, कैलास चौधरी, कैलास माळी, भागवत टिकारे, किशोर गायकवाड, गणेश पाटील, भरत अप्पा पाटील, दिपक वाणी, प्रदिप बडगुजर, विजय चौधरी, विनोद कोळी, रुपेश गांधी, जाफर शेख, हकिम बागवान, मुजमिल शाह, दिपक झंबड, प्रमोद शेळके, रामराव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, वामन ताठे, प्रमोद फरफट, सतिष पाटील, मधुकर पाटील, डॉ. काजळे, गोपाळ गंगतिरे, किरण वंजारी, फिला राजपुत, नाना माळी, नईम खान, संजय पाटील, पांडुरंग पाटील, संभाजी पारधी, प्रफुल लढे, श्याम पाटील, अजय पाटील,रवी खेवलकर पदाधिकारी उपस्थित होते,