जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । सावदा येथील किरणा दुकानासह हॉटेलमध्ये हातसफाई करणाऱ्या संशयित आरोपीला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अडावद येथून गुरूवार ७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता अटक केली आहे. त्याच्याकडून ४ हजार २४८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अक्षय संजय कोळी (वय २१, रा. इंदिरानगर प्लॉट अडावद, ह.मु. धानोरा रोड, अडावद) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या घरफोडीच्या घटना उघडकीस आणण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोहेकॉ संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, कमलाकर बागुल, गोरखनाथ बागुल यांचे पथक तयार करुन कारवाईसाठी अडावद येथे रवाना केले होते. या पथकाने संशयीत अक्षय कोळी याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने गुरूवार ७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपी अक्षय याला अडावद गावातून अटक केली. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने चोपडा शहरातील कारगील चौकातील एका हॉटेलमध्ये तर सावदा फौजपुर रोडवरील किरणा दुकानात चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४ हजार २४८ रु पयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी सावदा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.