भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील आठवडे बाजारात एकाला काहीही कारण नसतांना दोन जणांनी शिवीगाळ करत फावड्याच्या दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रमजान छट्टु निमसुरवाले वय ४५ रा. वासीम हा तरूण कामाच्या निमित्ताने भुसावळ शहरातील आवठडे बाजारात आलेला होता. बुधवारी ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वसीम पिंजारी, आकाश उर्फ चॅम्पियन इंगळे दोन्ही राहणार पंचशीलनगर, भुसावळ यांच्यासह इतर अनोळखी दोन जणांनी काहीही कारण नसतांना रामजान निमसुरवाले याचा रस्ता आडवून शिवीगाळ करत फावड्याच्या दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच या परिसरात आला तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर हे करीत आहे.