पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात वाहन खरेदीसाठी बोगस कागदपत्रे देऊन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने भारती सहकारी बँकेची १९ लाख ७० हजार ४८ रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना २५ ऑक्टोबर २०२१ ते १५ मे २०२४ या दरम्यान बँकेच्या धायरी येथील शाखेत घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, आरोपी अमोल गायकावाड याने टोयटों इनोव्हा क्रिस्टाच्या खरेदीकरिता मुकुंदनगर येथील आयआयसीआयसीआय या बँकेतच्या शाखेत सोनक ऑटोमोबाईल या शोरूमच्या नावाने बनावट नावाने बँक खाते घडून भारती सहकारी बँकेच्या धायरी शाखेतून वाहन कर्जासाठी १९ लाख ७० हजार ४८ रुपयांचे कर्ज रुपये घेतले. या पैशातून वाहन खरेदी करणेचे गरजेचे असतांना आरोपीने ते घेतले नाही. अमोल संजय गायकवाड (रा. डीएसके विश्व्रस्ता, धायरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एकावर सिंहगड पोलीस रोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बँकेचे मॅनेजर विजय भगवान कदम यांनी फिर्याद दिली आहे. वाहन कर्ज रक्कम आणि त्यावरील व्याजाची परतफेड न करता फसवणूक केल्याचे फिर्यादेत नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस निंबाळकर तपास करत आहेत.