वरळी परिसरात झाड अंगावर पडल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईत वरळी परिसरात झाड अंगावर पडल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी ९.३० वाजता घडली. या घटनेत अंगावर झाड पडलेला व्यक्ति गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असतांना संध्याकाळी ५ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार अमित जगताप असे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. अमित जगताप हे सकाळी ९.३० च्या सुमारास जांबोरी मैदान गल्लीत एका चाळी जवळून जात होते. यावेळी त्यांच्या अंगावर अचानक एक झाड कोसळले. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. रस्त्यावरील नागरिकांनी जगताप यांना तातडीने रिक्षातून दवाखान्यात भरती केले. तसेच या घटनेची माहिती ही मुंबई महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देखील देण्यात आली.

रस्तावर झाड कोसल्याने येथे वाहतूक कोंडी झाली होती. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येऊन कोसळलेल्या झाडाचे तुकडे रस्त्याच्या बाजूला केले. यानंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली. अमित जगताप यांना तातडीने रुग्णालयात नेले. त्यांच्यावर दिवसभर उपचार सुरू होते. मात्र, गंभीर जखमी झाल्याने सायंकाळी ५.४० वाजता त्यांचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाला.

Protected Content