चोरानेच आणून बांधली बैलजोडी; चुंचाळेतील सीसीटीव्हीमुळे चोरी उघडकीस

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील एका शेतकऱ्याची ७० हजार रूपये किंमतीच्या बैलजोडीची चार दिवसांपुर्वी चोरीस गेली होती. चुंचाळे गावातील सीसीटीव्हीमुळे चोरट्याने चोरलेली बैलजोडी पुन्हा चोरलेल्या जागेवरच आणून ठेवल्याचा प्रकार आज उघडकीला आला आहे. चोरटा फरार असून याप्रकरणी यावल पोलीसात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील चुंचाळे येथील अशोक मयाराम धनगर (वय-५५) हे शेतकरी असून शेती करून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शेतीच्याकामासाठी त्यांच्याकडे ७० हजार रूपये किंमतीची बैलजोडी आहे. चार दिवसांपुर्वी त्यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात दोन्ही बैलांना बांधले होते. अज्ञात व्यक्तीने दोन्ही बैलांची जोडी चोरून नेल्याचे उघडकीला आले होते. ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतल्यानंतर किनगाव गावातील प्रमुख रस्त्यांवरील सीसीटीव्ह कॅमेरे तपासले असता एक संशयित आरोपी दिसून आला. संशयित चोरटा हा गावातील तरूण असल्याचे प्राथमिक अंदाज समोर आला. त्यावर ग्रामस्थांनी थेट आरोप लावत तू चोरून नेलेली बैलजोडी जागेवर पुन्हा आणून दे असे सांगितले.   संशयित आरोपीने अखरे गुरूवारी रात्री थेट ज्या ठिकाणाहून बैल जोडी चोरून नेली होती. त्याच ठिकाण शेतातील केळी भागात आणून बांधून ठेवली. चोरीचा संशय असलेला व्यक्ती मात्र अद्याप फरार आहे. 

या घटनेच्या आधीच पंधरा दिवस आधी गावातील प्रभाकर धनगर यांचा एक बैल चोरीस गेला होता.  यशवंत सुपडु पाटील यांची ट्रॅक्टरची ट्रॉली दोन महिन्यापूर्वी चोरीस गेली आहे. शेतकऱ्यांची सततचे पशुधन चोरीस जात असल्याने व तेसुद्धा संशयित आरोपीने नेल्याच्या समजातून संशयित आरोपी विरुद्ध ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Protected Content