जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्त ‘भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खान्देशच योगदान’ ह्या विषयावर महाविद्यालयातील धांडे हॉलमध्ये एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होतं.
यावेळी क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे संचाल विद्यार्थी विकास डॉ सुनील कुलकर्णी, सिनेट सदस्य डॉ डी के कोल्हे ,लेवा एज्युकेशन युनियनचे संचालक तसेच प्रभारी अध्यक्ष प्रा.व. पू होले, प्राचार्य डॉ गौरी राणे, उपप्राचार्य डॉ व्ही जे पाटील, प्रा.पी एन तायडे, डॉ जयेन्द्र लेकुरवाळे उपस्थित होते
यावेळी या राष्ट्रीय चर्चा सत्राचे प्रमुख वक्ते लेखक तसेच कथाकथनकार प्रा.व. पू. होले यांनी स्वातंत्र्य काळातील खान्देशातील फैजपूर येथील 1936 काँग्रेसच्या पाहिल्या अधिवेशनाचे चित्रच डोळ्यासमोर उभे केले,स्वातंत्र्याची पाळेमुळे खेडोपाडी वाडे-वस्तीत पोहचवण्याचे कार्य फैजपूर अधिवेशनाने केले. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीला बळ देणारे फैजपूर अधिवेशन ठरले. हे अधिवेशन गांधी नेहरू यांच्यामुळे नव्हे तर काबाड कष्ट करणारे शेतकरी, मजूर, तसेच सर्व जाती धर्माचे खान्देशातील हजारो हात राबले यामुळेच हे अधिवेशन यशस्वी ठरले असे ही व.पू होले यांनी यावेळी सांगितले व त्याकाळातल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात खान्देशातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले त्यांचा इतिहास येणाऱ्या पिढीला सांगायला हवा असे होले यांनी यावेळी सांगितले.
विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. डी. के. कोल्हे यांनी खान्देशात गांधी वादी विचारांचा पगडा मोठा आहे, स्वातंत्र्य पूर्व काळात शहिद शिरीष कुमार , खाज्या नाईक यांचे बलिदान महत्वाचे आहे हे बलिदान आपण विसरता कामा नये.स्वातंत्र चळवळीमध्ये आपण सहभागी नव्हतो, पण आपल्या प्रत्येकाच्या घरातील पूर्वज स्वतंत्र लढ्यात सहभागी होते.
विद्यापिठ विद्यार्थी कल्याण संचालक डॉ सुनील कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेव्हढे महात्मा गांधी यांचे योगदान आहे तितकेच योगदान साहित्याचे आहे. लोकांपर्यंत स्वातंत्र्याचे विचार पोहचवण्यासाठी साहित्य मोलाचे ठरले. ज्यांनी स्वातंत्र्यात जन्म घेतला त्यांना पारतंत्र्याच्या झळा कळणार नाही, असे सांगत खान्देशातील स्वातंत्र लढा हा जगासमोर आला पाहिजे यासाठी विद्यापीठाने विविध उपक्रम हाती घेऊन सर्वाधिक निधी देत आहे. देशाची अस्मिता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचला पाहिजे असा मानस कबकचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आहे.असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ गौरी राणे यांनी स्वातंत्र्य काळात आपल्या घरातीलही व्यक्ती यात सहभागी होते हे अनेकांनाही माहिती नाही, माझेच आजत सासरे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते , इंग्रजांचे साहित्य घेऊन जाणाऱ्या रेल्वेचे ट्रॅक चाळीसगाव जवळ उखडून टाकणाऱ्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी असलेल्या स्वातंत्र्य सैनिकांवर सुरू असलेले खटले माझ्या आजल सासरे ऍड शिवराम रंगो राणे यांनी मोफत चालवले होते . हे घरात चर्चा केल्यावर समजलं असे अनेक आपल्याच घरातील खान्देशातील स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांचा इतिहास समोर आला पाहिजे अस मत प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी व्यक्त केले.
“भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खान्देशचे योगदान”
राष्ट्रीय चर्चासत्रात 17 प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले, तर 40 प्राध्यापकांची उपस्थिती होती, शोधनिबांधावर प्रश्नोत्तरेही घेण्यात आली.
सूत्र संचालन व प्रास्ताविक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉ. विनोद नंनवरे यांनी केलं. तर डॉ दीपक किंनगे, डॉ. अशोक पाटील, डॉ. सचिन कुंभार, प्रा.निलेश कोळी,प्रा.संतोष सोनवणे, प्रा.सुचित्रा लोंढे, प्रा.प्रियांका आठे प्रा.रवी परदेशी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.