गणेश विसर्जन मार्गाची आयुक्तांनी केली पाहणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमिवर आज आयुक्तांनी मनपा अधिकाऱ्यासह आगमन व विसर्जन मार्गाची पाहणी केली.

 

यंदाच्या गणेशमूर्ती विसर्जन मार्गासंदर्भातील विविध स्वरूपातील नियोजन करण्याच्या अनुषंगाने शहरातील इच्छादेवी चौक ते मेहरुण तलावपर्यंतच्या रस्त्यासह मेहरुण तलाव परिसराची आयुक्त डॉ. विद्या गायकवाड  यांनी आज पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या समवेत सामाजिक संस्था,  सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे पदाधिकारी, अमित जगताप, अजिंक्य देसाई,  विराज कावडीया, मुन्ना बारी  यांच्यासह  पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्त विद्या गायकवाड यांनी  गणेश विसर्जन मार्गाचे नेमके कसे नियोजन करता येईल? कुठे निर्माल्य संकलनाची व्यवस्था करावी ?  मिरवणूक मार्गावर कुठे-कुठे खड्डे पडले आहेत व कुठे डागडुजी करणे आवश्यक आहे? वाहतूक व्यवस्थेचे नियोजन कशा पद्धतीने करावे लागेल?  गणेश घाटासह आणखी किती ठिकाणी निर्माल्य संकलन केंद्रे उभारता येऊ शकतात? आदी विषयांवर नियोजनाच्या दृष्टिकोनातून संबंधितांमध्ये विस्तृत चर्चा झाली. तसेच  मेहरूण तलाव परीसरातील नागरिकांनी इतर मार्गानेमेहरूण तलावात सोडण्यात असल्याच्या तक्रारि प्राप्त झाल्या होत्या.  त्या अनुषंगाने आज आयुक्त विद्या गायकवाड यांनी पाहणी केली.  याप्रसंगी महापालिकेचे सहायक आयुक्त तथा आरोग्य अधिकारी अभिजित बाविस्कर,  बांधकाम शाखा अभियंता नरेंद्र  जावळे, सहाय्यक नगररचनाकार शकील शेख, कनिष्ठ अभियंता मनीष अमृतकर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Protected Content