Home क्राईम ब्रेकिंग न्यूज : भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; शिरसोली गावातील घटना

ब्रेकिंग न्यूज : भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; शिरसोली गावातील घटना

0
222

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रच्या समोरील रस्त्यावर भरधाव कारने जळगावकडे येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवार १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. दोन्ही मयत हे जळगाव तालुक्यातील विटनेर तांडा येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. कांतीलाल उर्फ कान्हा रमेश राठोड वय २४, आणि रवींद्र किसन चव्हाण वय ३० दोन्ही रा. विटनेर तांडा ता. जळगाव मयत झालेल्या दोघांची नावे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील विटनेर तांडा या गावात कांतीलाल राठोड आणि रवींद्र चव्हाण हे वास्तव्याला होते. दरम्यान गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी क्रमांक नंबर (एमएच १९ इएल ३११) ने शिरसोलीकडून जळगावकडे येत असताना शिरसोली गावातील आकाशवाणी केंद्रच्या टावर समोरून भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेल्या बाईकचे मोठे नुकसान झाले दरम्यान घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेत खाजगी वाहनातून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान शेवटची वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.

कांतीलालच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ तर रवींद्र चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, काका, आजोबा आणि काकू असा परिवार आहे.


Protected Content

Play sound