अल्पवयीन मुलावर खूनी हल्ला मात्र तो सुटल्याने त्याच्या मित्राचा केला खून

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राहत असलेल्या परिसरातील वर्चस्वाच्या वादातून टोळक्याने एका अल्पवयीन मुलाला लक्ष्य करुन त्याच्यावर खूनी हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र, तो मुलगा टोळक्याच्या तावडीतून सुटल्याने हाती लागलेल्या त्याच्या मित्राचा टोळक्याने निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री एक वाजता कोथरूड परिसरात घडली. यातील काही आरोपींना गुन्हेने अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी १७ वर्षे ११ महिण्याचा मुलगा आहे. तर मृत हा त्याचा मित्र आहे. ते दोघेही इतर मित्रांसोबत रात्री गप्पा मारत रस्त्यावर उभे होते. यावेळी आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने दुचाकीवरुन येऊन त्यांच्या मोपेडला धडक देऊन त्यांना खाली पाडले. यानंतर फिर्यादीवर धारदार कोयत्याने वार केला, त्याने तो चुकविला. मात्र कोयत्याच्या दुसरा उलटा वार त्याच्या हातावर लागला. श्रीनु शंकर विसलवात (२२, रा. लक्ष्मीनगर, डहाणूकर कॉलनी,पुणे ) असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर आरोपींनी कोयत्याने मानेवर आणि पाठीवर पाच ते सहा वार केले होते. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात सहा जणांविरुध्द खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहे

Protected Content