धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील शेरी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील शेरी येथे १७ वार्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी ९ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. तिच्या नातेवाईक यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतु अल्पवयीन मुलीबाबत काहीही माहिती मिळाली नाही, अखेर धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन महाजन करीत आहे.