गोमांस विक्री करणाऱ्यावर कारवाई; मुद्देमाल केला हस्तगत

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी| शहरातील भिलपुरा परिसरातील ईस्लामपुरा परिसरात अवैधरित्या गोवंशाची कत्तल करुन त्याच्या मासांची विक्री करणाऱ्यांवर शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात मांस जप्त केले असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

शहरातील भिलपुरा परिसरातील ईस्लाम पुरा परिसरात अवैधरित्या गोवंशाची कत्तल करुन त्याच्या मासांची विक्री केली जात असल्याची तक्रार डायल ११२ वर करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, गिरीश पाटील, राहुल घेटे, मुकुंद गंगावणे, योगेश साबळे यांच्या पथकाला कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने ईस्लाम पुरा परिसरात धाड टाकली असता, याठिकाणी दोन संशयित गोवंशाचे मांस विक्री करतांना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे शेकडो किलो मांस जप्त केले आहे. ते मांसाची तपासणीसाठी ते प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Protected Content