अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकरा ते ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर शुक्रवारी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे करीत आहे.

Protected Content