Home क्राईम अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !

0
121

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची घटना मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता समोर आली आहे. या संदर्भात रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत घरातून फूस लावून पळून नेले आहे. हे घटना पीडित मुलीच्या नातेवाईकांना लक्षात आल्याने त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे तिच्या पालकांनी रात्री ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे करीत आहे.


Protected Content

Play sound