Home क्राईम अल्पवयीन मुलीला मध्यरात्री फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीला मध्यरात्री फूस लावून पळविले; एकावर गुन्हा दाखल

0
52


चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला गावात राहणारा एका तरूणाने काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून पळवून नेल्याची घटना २१ मे रोजी मध्यरात्री दीड वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी २८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगे गावात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. दरम्यान गावात राहणारा विजय दिपक गांगुर्डे वय १८ याने २१ मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत तिला फूस लावून पळवून नेले. अशी तक्रार पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवार २८ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता पोलीस ठाण्यात संशयित आरोपी विजय गांगुर्डे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound