भुसावळ तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात परप्रांतीय १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची घटना शनिवार १५ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीसात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक असे की, मध्यप्रदेशातील राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही भुसावळ तालुक्यातील एका गावात आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना शनिवार १५ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आले आहे. हा प्रकार तिच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी सायंकाळी ७ वाजता भुसावळ तालुका पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भोई हे करीत आहे.

Protected Content