जळगाव प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगरातून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला देवदर्शनासाठी घेवून जात असल्याचे सांगून फूस लावून पळवून नेल्याची घटना २० मार्च रोजी उघडकीला आली. याप्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एका महिलेवर एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील अयोध्या नगरात १६ वर्षीय मुलगी आपल्या आई व मोठी बहिणीसोबत राहते. त्याच भागात राहणारी कल्पनाबाई रोहीदास (पुर्ण नाव माहित नाही) या महिलेने उज्जेन याठिकाणी देवदर्शनासाठी जायचे आहे असे मोठ्या मुलीला सांगून अल्पवयीन असलेली १६ वर्षीय लहान मुलीला कायदेशीर रखवालीतून १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास फुस लावून पळवून नेले. हा प्रकार पिडीत मुलीच्या आईला २० मार्च रोजी लक्षात आला. पीडीत मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.