जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रेल्वेस्थानक येथील १८ वर्षीय तरूणी ही घरात कुणाला काहीही न सांगता बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी गुरूवारी २२ मे रोजी पहाटे ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रजनी पुरूषोत्तम आदिवासी वय १८ रा. बळेगाव ता.रायपुरा मध्यप्रदेश असे बेपत्ता झालेल्या तरूणीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रजनी आदिवासी ही तरूणी आपल्या कुटुंबियांसह बुधवारी २१ मे रोजी सकाळी १०.३० आपल्या नातेवाईकांसह जळगाव येथील रेल्वेस्टेशन येथे आलेल्या होत्या. त्यानंतर तरूणीने कुणाला काहीही न सांगता घरातून कुठेतरी निघून गेली. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी नजिकच्या शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुधीर साळवे हे करीत आहे.