हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश! पाचोऱ्यात ‘संदल ए मुबारक’ उत्साहात

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील बस स्टॅण्ड रोडवरील मानसिंगका फॅक्टरीत असलेल्या पीर सैय्यद गयबान शहॉवंली दर्गा येथे आज, १७ एप्रिल गुरुवार रोजी सकाळी ११:३० वाजता ‘संदल ए मुबारक’ चे आयोजन करण्यात आले होते. हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांमध्ये एकतेचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे ए. एस. आय. शकील शेख आणि पोलिस बाॅईज असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नदीम शकील शेख यांच्यातर्फे करण्यात आले होते.

या विशेष कार्यक्रमात उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय येरुळे, पोलिस निरीक्षक अशोक पवार, पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पो.उ.नि. प्रकाश चव्हाणके, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे, पो.उ.नि. सोपान गोरे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाटील यांच्यासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पीर सैय्यद गयबान शहाॅंवली दर्ग्याचे आशीर्वाद घेतले आणि त्यानंतर आयोजित महाप्रसाद व लंगर नियाजचा लाभ घेतला.

या पवित्र दर्ग्याची देखभाल मुजावर शेख दादामियॉ हे करतात. ‘संदल ए मुबारक’ च्या या कार्यक्रमात पाचोरा शहर आणि परिसरातील पत्रकार बांधवांसह मोठ्या संख्येने नागरिकांनी देखील उपस्थिती दर्शविली आणि कार्यक्रमाचा लाभ घेतला. हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन या धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतल्याने एकतेचा आणि सलोख्याचा संदेश सर्वदूर पोहोचला. ‘संदल ए मुबारक’ हा कार्यक्रम दरवर्षी याच ठिकाणी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी देखील त्याच परंपरेनुसार हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला, ज्यात समाजातील सर्व स्तरातील लोकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

Protected Content