कर्ज फेडण्यासाठी दोन लाखांची मागणी करत विवाहितेला मारहाण

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी शिंदखेडा येथे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून २ लाख रूपये आणावे अशी मागणी करत दारू पिऊन मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी २.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथील माहेर असलेल्या लिना मनोज पाटील वय २९ यांचा विवाह धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथील मनोज भालेराव पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नानंतर काही वर्षांनी विवाहितेला माहेराहून कर्ज फेडण्यासाठी २ लाख रूपये आणावे अशी मागणी पती मनोज पाटील याने करून त्यांना दारूपिऊन मारहाण करण्यास सुरूवात केली. याबाबत सासू, सासरे, दिर, नणंद यांना देखील सांगितले असता त्यांनी देखील पैसे आणावे अशी मागणी करत मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी २.३० वाजता अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पती मनोज भालेराव पाटील, सासरे भालेराव खंडेराव पाटील, सासू वंदना भालेराव पाटील, दीर प्रमोद भालेराव पाटील, नणंद वैशाली संजय पाटील सर्व रा. शिंदखेडा ता. धुळे यांच्या विरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.

Protected Content