भुसावळ हत्याकांड प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

भुसावळ -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनिल राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणातील उर्वरित फरार झालेल्या आरोपींना अटक करा, हा खटला जलद न्यायालयात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावी, अन्यथा भुसावळ शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत मी वडार महाराष्ट्राचा संघटनेच्या वतीने बुधवार ३ जुलै रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहरात २९ मे रोजी रात्री माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सुनिल राखुंडे यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात काही मारेकऱ्यांना अटक करण्यात आली तर काही आरोपी हे अद्याप फरार आहे. या गुन्ह्यातील फरार आरोपी त्वरीत अटक करण्यात यावी, हा खटला जलद न्यायालयात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या मार्फत चालविण्यात यावा आणि सर्व मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बुधवारी ३ जुलै रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

Protected Content