जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सेंट्रल बँक कॉलनी परिसरात बंद घर फोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात सोमवार ७ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय सुखदेव भाई (वय ५४, रा. सेंट्रल बँक कॉलनी पिंप्राळा जळगाव) यांचे ३ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान राहते घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात सोडताना बंद घराचे कडी कोयंडा व कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार सोमवारी ७ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता समोर आला दरम्यान या संदर्भात संजय भोई यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चोरी झाल्याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांवर रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुशील चौधरी हे करीत आहे.