जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील विठ्ठल पेठ येथील बंद घर फोडून सोने चांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकुण ७३ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुरूवार १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक येथील आयटी कंपनीत नोकरीस असलेले हरिष गोपाळ नेमाडे हे शहरातील जुने जळगावातील विठ्ठपेठेत राहतात. दोन महिन्यांपुर्वी त्यांच्या आईचे निधन झाल्याने ते विठ्ठल पेठेतील घराला कुलूप लावून नाशिक येथे कुटुंबियांसह स्थायिक झाले आहे. त्याच्या घराच्या कंपाऊंटमध्ये गणपतीचे मंदिर असल्याने ते अधून मधून कुटुंबियांसह येत असतात. १३ रोजी सकाळच्या सुमारास हरिष नेमाडे यांना अनुप पाठक यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गंज तुटलेले असल्याची माहिती दिली. त्यानुसार शेजारी राहणाऱ्या नगारीकांनी घरात जावून पाहणी केली असता चोरट्यांनी घरातील बेडरुमधील दोघ लोखंडी कपाट टॉमीने तोडलेले त्यांना दिसून आले. घरातून सोन्याची अंगठी, लेडीज चैन, रोख रक्कम, गॅस सिलेंडर असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण करीत आहे.
बंद घर फोडून सोने-चांदीचे दागिन्यांसह रोकड लांबविली
2 years ago
No Comments