यावल तालुका समन्वय समिती व महिला व बाल विकास विभागाची संयुक्त बैठक संपन्न

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ‘मिशन वात्सल्य’ अंतर्गत समितीमार्फत माहिती कार्यालयाच्या ‘[email protected]’ या मेल आयडीवर तात्काळ सादर करावी असं जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनकर यांनी आवाहन केलं आहे. या संदर्भात यावल तहसील कार्यालयात यावल तालुका समन्वय समिती व महिला व बाल विकास विभागाची संयुक्त बैठक संपन्न झाली.

तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, महीला व बालविकास विभागाच्या अर्चना आटोळे, यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी सरवर तडवी यांच्यासह महीला व बालविकास प्रकल्प कार्यालयाच्या मुख्य सेविका व अधिकारी वर्ग उपस्थित होते.

महिला व बालविकास विभाग जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने मिशन वात्सल्य तालुका समन्वय समिती तथा तहसीलदार आणि तालुका समन्वय समिती तथा बाल विकास अधिकारी यांना पत्रक पाठवून त्या अंतर्गत ‘सर्वोच्च न्यायालयाकडून बाल न्याय निधीसाठी प्राप्त रकमेचा विनियोग तसेच ‘मिशन वात्सल्य’ योजनेच्या अंमलबजावणी करणेबाबत सूचना आणि मार्गदर्शक सूचंना याबाबत माहिती देण्यात आली आहे. यावर चर्चा करण्यासाठी यावल तहसील कार्यालयात यावल तालुका समन्वय समिती व महिला व बाल विकास विभागाची संयुक्त बैठक संपन्न झाली.

यात न्यायालयाकडे रक्कम राज्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय नीधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यासाठी ८५ लाख रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे

‘नमूद मार्गदर्शक सूचना आणि कार्यपद्धतीनुसार सदर रकमेचा उपयोग ‘कोविड-१९’ मुळे एक वा दोघी पालक गमावलेल्या बालकांच्या शालेय शुल्क, वस्तीगृह शुल्क, आणि शैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशासाठी करण्यात येईल. एका बालकास एक वा अधिक कारणासाठी सहाय्य देता येईल. ते एका बालकास एकाच वेळी देता येईल; तथापि याशिवाय अन्य कोणत्याही कारणासाठी किंवा सरसकटपणे लाभाची रक्कम वितरित करता येणार नाही. सदर अर्थसहाय्यकाची कमाल मर्यादा दहा हजार इतकी असेल.’ असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

त्यामुळे सदर रक्कम संबंधित ‘कोविड-१९’ व एक वा दोन्ही पालक जन्मलेल्या बालकांना कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनांनुसार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. संबंधित बालकांकडून याबाबत अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे मागवून सदर बालकांची यादी जिल्हास्तरीय ट्रास्क फोर्सच्या बैठकीत सादर करून त्यास समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. अर्जासोबत बँक पासबुकची झेरॉक्स शाळेत दाखल असल्याचा पुरावा आणि कोविडमुळे पालक मयत झाल्याचा अहवाल पुरावा सादर करणे आवश्यक आहे.

एक पालक किंवा दोन पालक, विधवा तसेच एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘वात्सल्य मिशन’ अंतर्गत तालुकास्तरीय समन्वय समिती गठीत असून सदर समितीमार्फत सोबत असलेल्या विहित नमुन्यात माहिती कार्यालयाच्या ‘[email protected]’ या मेल आयडीवर तात्काळ सादर करण्यात यावी. असं जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डॉ.वनिता सोनकर यांनी आवाहन केलं आहे. यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.

Protected Content