भुसावळ – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील पापा नगरात शॉर्टसर्किटमुळे मध्यरात्री घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत १ लाख ९७ हजार रुपये किंमतीचे संसारोपयोगी वस्तूंसह आदी वस्तू जळून खाक झाल्याचे समोर आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाजेराबी शेख अय्युब (वय-५०) रा. उस्मानिया नक्षाबंदी, पापा नगर, भुसाळ यांच्या घराला बुधवार २३ मार्च रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याने खळबळ उडाली होती. यावेळी नागरिकांनी घरातील पाणी न मिळाल्याने त्यांनी नाल्याच्या पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु ही आग आग एवढी मोठी होती की, घरातील संसारोपयोगी वस्तू आणि इतर महत्वाच्या वास्तू असा १ लाख ९७ हजार रूपये किंमतीचे वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान भुसावळ नगरपालिकेचा अग्निशमन बंब एक तास उशिराने घटनास्थळी दाखल झाल्याने येथील नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला होता. दरम्यान ही आग कशामुळे लागली हे अद्याप कळू शकलेले नाही. भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी माजी नगरसेवक शेख पापा शेख कालू यांनी देखील मदत कार्य सुरू केले होते.याप्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सत्तार शेख करीत आहे.