जळगावात आलेल्या परप्रांतीय मजुरांना सेवा धर्म परिवाराकडून मदतीचा हात

जळगाव प्रतिनिधी । शहरात सध्या सर्वत्र अमृत योजनेची पाईप लाईन टाकण्याच काम युद्ध पातळीवर सुरू आहे  या साठी सात राज्यातून हजारांच्या वर मजूर खोद काम करण्या साठी दाखल झाले आहेत. त्यांना सेवा धर्म परिवारातर्फे नव्या कपड्यांच्या स्वरूपात मदत करण्यात आली. 

जळगाव कर नागरिकांच्या सोइ-सुविधे साठी सकाळी सात ते रात्री च्या सात वाजे पर्यन्त हा मजूर वर्ग रस्त्यावर खोद काम करून आपली उपजीविका भागविताना दिसत आहे.  या कामात केवळ पुरुषच नव्हे तर लहान मुले आणि महिलाही मोठ्या संख्येने सहभागी झाले असल्याच पाहायला मिळत आहेत

सध्या संपूर्ण राज्यभर थंडीची लाट पसरली असतांना हा मजूर वर्ग मात्र रात्रीच्या वेळेस आपल्याला लहानग्या मुलांच्या सह उघड्यावर वास्तव्य करून आहे

जळगाव शहराच्या सोइ साठी काम करणाऱ्या या मजुरांना मात्र मोठ्या अडचणी चा सामना या थंडी च्या काळात करावा लागत असल्याच ,संवेदनशील जळगाव कारांच्या लक्षात आले होते.

थंडीत मजुरांची होणारी अडचण पाहता जळगाव शहरातील सेवाधर्म  संस्थेच्या वतीने 300 मजुरांच्या साठी आणि त्यांच्या मुलांच्या साठी नव्या कपड्यांचं वाटप आज करण्यात आले आहे. हजारांच्या पुढे असलेली  मजुरांची संख्या पाहता अजूनही   या मजुरांना मदतीची आवश्यकता असल्याने दात्यांनी या मजुरांना गरम कपडे दान करावे ,ज्यांना प्रत्यक्ष करणे शक्य होणार नसेल त्यांनी सेवा धर्म संस्थेशी संपर्क करावा असे  आवाहन सेवाधर्म संस्थेचे चंद्रशेखर नेवे यांनी केले आहे. 

जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात वास्तव्य असलेल्या या मजुरांना आज नवीन कपडे वाटप करते वेळी सेवाधर्म संस्थेचे चंद्रशेखर नेवे,सेवारथ परिवाराचे डॉ रितेश पाटील,पंचरत्न फाउंडेशन च्या वैशाली पाटील,गुजराती मंडळाच्या भावना चव्हाण,जिंदगी फाउंडेशन च्या सुषमा भालेराव, अजय पाटील,महेश शिंपी,सारंग नेवे,दीपेश फिरके इत्यादी मान्यवर उपस्थित  होते. रमेश कुमार मुनोत यांनी कपडे उपलब्ध करून दिले आहेत ,तर कार्यक्रमाच्या यशस्विते साठी डॉ नीलिमा सेठिया ,आरोही नेवे यांनी प्रयत्न केले आहे.

 

 

Protected Content