नव्या कृषी कायद्यांना विरोधासाठी विरोध –रविशंकर प्रसाद

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नव्या कृषी कायद्यांना जाणूनबुजून विरोध केला जात आहे. पण आम्ही सारे जण हे शेती कायदे शेतीसाठी कसे लाभदायक आहेत याबद्दल लोकांना आणि शेतकऱ्यांना समजावून देऊ” असे केंद्रीय कायदे मंत्र रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केलेल्या तीन नव्या शेतकरी कायदांविरोधात गेले अनेक दिवस दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ विरोधी पक्षाने भारत बंदही पाळला होता. या बंदला विविध राज्यात वेगवेगळ्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला. सत्ताधारी पक्षातील नेते मात्र या शेतकरी आंदोलनात राजकीय शक्तींचा हात असल्याचा आरोप सातत्याने करताना दिसत आहेत. काही सत्ताधारी नेत्यांनी तर या आंदोलनात शेतकऱ्यांमध्ये काही नक्षलवादी आणि देशद्रोही घुसले असल्याचाही आरोप केला आहे. त्या आरोपांना समाजवादी पक्षाकडून उत्तर देण्यात आले.

“महत्त्वाचे राजकीय नेते आणि प्रख्यात लोक आज शेतीसंबंधीच्या कायद्याचा निषेध करत आहेत. हे सारे लोक केवळ कायद्यांना विरोध करायचा म्हणूनच विरोध करत आहे. त्यांची याबाबत कोणतीही ठोस भूमिका नाही. या कायद्यात सुचवलेल्या सुधारणांची गरज या लोकांनी आधीच ओळखली आहे असेही रवी शंकर प्रसाद म्हणाले

Protected Content