यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील उंटावद येथील किसान सहकारी दुध उत्पादक सोसायटी लिमिटेड येथे जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघामार्फत शेतकरी बंधूसाठी कार्यशाळा संपन्न झाली.
या कार्यशाळेत पशुपालक शेतकरी दुधाळ गाई म्हैशींच्या प्रकृती बाबत कशी काळजी घ्यावी तसेच जंत निर्मुलन व लसीकरण, भाकड काळ कसा कमी करावा व कमी खर्चात दुग्ध व्यवसाय कसा करावा याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले तर जंत निर्मुलन, लसिकरण, संतुलीत चारा व्यवस्थापन, स्थनदाह, मिनीरल मिक्चर व पशुखाद्य इतर सह दुग्धव्यवसायावर आधारीत विविध विषयांवर जिल्हा दुध संघाचे डाँ.पंकज राजपुत डाँ.विलास अत्तरदे (पशुधन पर्येवेक्षक) डाँ.महेश नारखेडे (पशुधन पर्येवेक्षक) व एन. डी.डी.बी.चे आय.आय.एल. निकीतेश निर्मळ यांनी दुध उत्पादकांना मार्गदर्शन केले.
यावेळी चेअरमन रामदास धनजी पाटील व्हाइस चेअरमन विवेक गणपत पाटील, अशोक बाबुराव पाटील, चंन्द्रकांत गणपत पाटील, संजय भाईदास पाटील, अनिल यशवंत पाटील, विकास विवेक पाटील, साहेबराव भाऊराव पाटील, प्रकाश भिका कोळी, पुष्कराज शशीकांत पाटील, मोहन लक्ष्मण महाजन, भुषण संजय पाटील, कल्पेश मधुकर पाटील इ.सह शेतकरी उपस्थित होते.