जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था, महाराष्ट्र – जळगावच्या वतीने खानदेशातील पहिले आणि राज्यस्तरीय तिसरे महाअधिवेशन भव्यदिव्य स्वरूपात जळगाव येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात पार पडले.
या ऐतिहासिक अधिवेशनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, राजे शंभूराजे आणि मा. जिजाऊ यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी “मराठा उद्योजक परभणी विशेषांक” या मासिकाचा प्रकाशन सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंगेश दादा चव्हाण, महाराष्ट्र राज्य कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, नामवंत उद्योजक सतीश मगर (पुणे), राजेंद्रसिंह पाटील, राजेंद्र शिंग पाटील, संजय वायाळ पाटील, विशाल देसले, डीडी बच्छाव सर, रोहित दादा निकम, संगीता पाटील, सुनील जी किर्दक, सुदाम पाटील, संजय पाटील (उपाध्यक्ष) आणि राज्य समन्वयक सुधाकर पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या अधिवेशनामध्ये मराठा समाजातील उद्योजकांना एकत्र येऊन आपले अनुभव, संधी आणि अडचणी यावर सखोल चर्चा करता आली. तसेच नवोदित उद्योजकांसाठी प्रेरणादायी व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. समाजातील तरुणांनी उद्योग क्षेत्रात अधिक मोठ्या प्रमाणात उतरावे, यासाठी मार्गदर्शनही करण्यात आले.
हा उपक्रम मराठा समाजातील उद्योगवृद्धीच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरला असून, समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मान्यवरांनी यावेळी केले.