Home Uncategorized मुक्ताईनगरमध्ये प्रथमच पार पडला जगदंबा मातेचा भव्य उत्सव

मुक्ताईनगरमध्ये प्रथमच पार पडला जगदंबा मातेचा भव्य उत्सव


मुक्ताईनगर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरात यंदा पहिल्यांदाच खामगाव येथील “मोठी देवी” म्हणून प्रसिद्ध असलेल्या जगदंबा मातेचे आगमन झाले असून, या आगमनानिमित्त संताजीनगर येथील महिला मंडळांनी नऊ दिवसांचा भव्य उत्सव भक्तीभावाने आणि उत्साहात साजरा केला. उत्सव काळात भक्ती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामाजिक एकतेचा संगम पाहायला मिळाला.

उत्सवाच्या नऊ दिवसांत दररोज सकाळी व संध्याकाळी आरती, भजन, कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्थानिक तसेच परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतले आणि भक्तिभावाने सहभाग नोंदवला. विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते.

गुरुवारी जगदंबा मातेला भव्य मिरवणुकीतून भावपूर्ण निरोप देण्यात आला. या वेळी ढोल-ताशांच्या गजरात, जयघोषांच्या नादात आणि भक्तिगीतांच्या सुरावटीत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. शहरातील विविध भागांमध्ये मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले आणि भक्तांनी देवीच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करून भक्तीभाव व्यक्त केला.

खामगाव येथील सुप्रसिद्ध जगदंबा उत्सव प्रथमच मुक्ताईनगरमध्ये पार पडल्याने नागरिकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते. संपूर्ण उत्सव शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याने आयोजक महिला मंडळांसह शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले. उत्सवाने शहरात धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचा सुंदर संदेश दिला.


Protected Content

Play sound