वाढदिवसात झालेल्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिकच्या पंचवटीयेथील पेठरोड कर्नल नगरच्या आशिष रणमाळी या १७ वर्षीय युवकाची गुरुवारी रात्री हत्या करण्यात आली आहे. आशिष दशरथ रणमाळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. ही हत्या त्याच्याच जवळच्या मित्रांनी केली असून वाढदिवसाच्या दिवशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. हा राग मनात धरून त्याच्या इतर तीन अल्पवयीन मित्रांनी तीक्ष्ण हत्याराने आशिषची हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर धाव घेत यातील तीनही अल्पवयीन मुलांना रात्रीतून ताब्यात घेतले. या घटनेची अधिक चौकशी सुरू आहे. सध्या नाशिक शहरात खुनाच्या घटनेमध्ये वाढ होत असून किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलं हत्यारे काढू लागली आहे, काही दिवसापूर्वीच पेठरोड परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती ही घटना ताजी असतानाच पंचवटीतील पेठरोड परिसरात हत्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारीकडे वळण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.

Protected Content