जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण येथील ३६ एकर जागेवर विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या संकुलात फुटबॉल मैदानाचा समावेश करण्यात यावा अशी मागणीचे निवेदन जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील मेहरूण येथील भागातील ३६ एकर जागेवर शासनाच्या मान्यतेनुसार मोठे विभागीय क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. या ठिकाणी होत असलेल्या कामांसंदर्भात क्रीडा संघटना व खेळाडूंकडून सुचना मागविण्यात आल्या आहेत. या अनुषंगाने शुक्रवार १७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूख शेख यांच्यासह विविध क्रीडा संघटना आणि खेळाडूंनी सुचना सादर केली आहे. मेहरूण येथे होत असलेल्या विभागीय क्रीडा संकुलात फुटबॉल मैदानाचा समावेश करावा अशी मागणी केली आहे.
विभागीय क्रीडा संकुलमध्ये प्रथमता फुटबॉल क्रीडांगणाचा समावेश नव्हता नंतर तो करण्यात आला आहे. तसेच कार्यरत शिवछत्रपती क्रीडा संकुलासाठी १७ कोटी रुपये उपलब्ध असून त्यात फुटबॉल संघटनाने अस्तित्वात असलेल्या फुटबॉल मैदानावर सिंथॅटीक मैदानाची मागणी केल्यास त्वरित करण्यात येईल, असे आश्वासन सुद्धा आयुष प्रसाद यांनी दिले. याप्रसंगी फारुक शेख, डॉ. अनिता कोल्हे, अब्दुल मोहसिन, तायर शेख, निवेदिता ताठे, हिमाली बोरोले, वर्षा सोनवणे, रवींद्र धर्माधिकारी, जल कासार, समीर शेख, प्रा छाया चिरमाडे, मनोज सुरवाडे, वसीम शेख, राहील अहमद, आकाश कांबळे, कुलदीप पाटील, धनंजय धनगर, कौशल पवार, दिनेश सिंग, अरबाज खान यांची उपस्थिती होती.