भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । खडके गावात राहणाऱ्या एका तरूणाची दुचाकीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना गुरूवारी १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी शुक्रवारी १८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील खडकी गावात भूषण रतिलाल चौधरी वय २९ तरुण वास्तव्याला आहे. भूषणचा फुल डेकोरेशनचा व्यवसाय आहे. या व्यवसायात भूषणला त्याचा मित्र दीपक उर्फ कुंदन सिंग हा काम करतो. दरम्यान गावात राहणारा पूनमसिंग विजयसिंह पाटील याने भूषण चौधरी याला दीपकला कामावरून काढून टाक असे सांगितले होते. त्यावेळी भूषणने दिपकला कामावरून काढले नाही. याचा राग आल्याने पूनमसिंग विजयसिंह पाटील रा. खडके तालुका भुसावळ याने रागातून भूषण चौधरी याची दुचाकी (क्रमांक एमएच १९ डीक्यू ८५५१) वर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिली. या आगीत भूषणची दुचाकी संपूर्ण जळून खाक झाली आहे. दरम्यान या संदर्भात भूषण चौधरी यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार पुनमसिंग विजयसिंह पाटील यांच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप बडगे करीत आहे.