नोएडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिला एचआर हेडचा विनयभंग व गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकणात त्याच कंपनीत काम करणाऱ्या दोन तरुणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेपासून आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. नोएडा पोलीस ठाणे सेक्टर-१२६ चे प्रभारी निरीक्षक प्रमोद कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलिसात दाखल तक्रारीत महिलेने म्हटले आहे की, ती सेक्टर-१२६ मधील एका कंपनीत एचआर हेड पदावर कार्यरत आहे.
प्रमोद कुमार सिंह यांनी पीड़ितेने दाखल केलेल्या तक्रारीच्या हवाल्याने सांगितले की, महिला एचआर हेडने काही दिवसापूर्वी कंपनीत कार्यरत आर्यन त्यागी आणि मोनित गोस्वामी यांना नोकरीकडून काढून टाकले होते. पीडितेने सांगितले की, त्याच दिवशी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास कंपनीतून ग्रेटर नोएडा येथील आपल्या घरी परतत होती. त्याचवेळी कोटक महिंद्रा बँकेच्या चौकात आर्यन आणि मोनितने तिच्याशी गैरवर्तन करत तिची छेड काढली. पोलिसांनी सांगितले की, तेथे उपस्थित लोकांनी याचा विरोध केल्यानंतर दोन्ही आरोपी तिला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी देत तेथून पसार झाले. पोलीस घटनास्थळाच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहे.